Wednesday, March 23, 2011





सुखमयी क्षणांची दोन पाखरे
अलगद विसावली खांद्यावर
कुजबुजली हलकेच कानात ,
"भावतं आम्हाला तुझ हास्य ओठांवर..."
          'नेहमी मनभर हसत रहा
          जगण्याच देणं भरभरून लुटत रहा,
          दुःखाचे क्षण  येणारच मार्गी
          त्यांनाही प्रेमाने स्विकारुन पहा..
नकार करणारच पाठलाग तुझा
तू मात्र त्याला घाबरून जाऊ नकोस
त्याच्यापासून  पळण्यापेक्षा 
त्याच्या  समोर धीराने उभी रहा,
           नकारालाही सांग  स्पष्ट 
           मला 'तू' नकोस तर
           तुझा 'होकार' हवा...
सुखाला पैशात मोजू नकोस
सुखाला काळात बांधू नकोस
ते येईल तेव्हा आणि तसं
त्याला आपलस कर
मग उधळून देईल तेही स्वतःला
तुझ्या सुंदर आयुष्यावर.."
             
     

5 comments:

  1. "सुखाला पैशात मोजू नकोस
    सुखाला काळात बांधू नकोस
    ते येईल तेव्हा आणि तसं
    त्याला आपलस कर
    मग उधळून देईल तेही स्वतःला
    तुझ्या सुंदर आयुष्यावर..""

    व्वा क्या बात है! स्नेहल !!!

    ReplyDelete
  2. सुखमयी क्षणांची दोन पाखरे
    अलगद विसावली खांद्यावर
    कुजबुजली हलकेच कानात ,
    "भावतं आम्हाला तुझ हास्य ओठांवर..."

    khup chan aahe liked it...

    ReplyDelete