Saturday, September 24, 2011

समांतर

कधीतरी ट्रेनच्या  window seat ला बसून निवांत प्रवास करायला  मिळालाच  तर... आणि खिडकीतून बाहेर पाहत राहील तर ...अंगावर येत या स्वप्न नगरीच दुसर विद्रूप रूप...अठरा विश्व दारिद्र्य.... रेल्वे line ला समांतर आपल्या सोबत चालत राहणारी झोपडपट्टी...मधेच त्यांना हिणवणाऱ्या टोलेजंग इमारती....पण डोळ्यात आणि डोक्यात भरते ती झोपडपट्टीच....कचरा आणि गरीबीच  पसरलेलं भयाण साम्राज्य...त्यातच  खेळणारी... जेवणारी लहान मुलं... मध्येच  कोणत्या तरी झुडपाच्या  आडोशाने drugs घेणाऱ्या तरुणांची चौकड....त्यातच त्यांनी पाळलेले कुत्रा, मांजर, कोंबड्या यांसारखे प्राणी....आणि मधूनच ट्रेनमध्ये कोणीतरी मारलेला शेरा..."यांना स्वतःला  राहायला घर नाही आणि हे प्राणी पाळत आहेत..."
     सगळच अंगावर येणार....खूप तीव्रतेने....आणि तितकाच हळुवार विचार करायला लावणार...स्वतःचा...माणसांचा... समाजाचा...पर्यायी आयुष्याचा....दर दिवशी नव्याने स्वतःच दुःख आधी पेक्षा  अधिक प्रेमाने गोंजारणार्या आपल्या क्षुद्र मनाचा....
      काय असावं त्या झोपडपट्टीतल्या लोकांच आयुष्य??...म्हणजे कोणीतरी जन्माला घातलय आणि मरू शकत नाही म्हणून जगत राहायचं...इतरांची नको असलेली सहानुभूती मिळवत...कोणाच्यातरी रागाचे  नाहक  फटके खात...कोणाच्यातरी वासनेचे बळी होत...जगत राहायचं....आणि असच एक दिवस कोणाला पत्ताही लागता  मरूनही जायचं...खूप  दिवसाचं शिळ अन्न खाल्लं म्हणून.... विषबाधेने...अतीव मारहाणीने...कोणीतरी जबरदस्ती शरीरात  देऊ घातलेल्या असाध्य रोगाने....किंवा  उपचारान  अभावी मरणाचं  कारण ठरलेल्या किरकोळ तापाने....
   जन्म  हातात  नाही आणि मरण हि....कोणाच्याच नसतं.....पण आयुष्य जगण तर हातात  असायला पाहिजे....तेही त्यांना नाही जगता येत....माणूस म्हणून तर नाहीच नाही....शिक्षण...आरोग्य...आनंद...मस्ती...कला....सुख....हे असले शब्द तर त्यांच्या  गावी हि नसतील...जस दरदिवशी जगल  जाणार त्यांच आयुष्य आपल्या गावी नाही....दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही आपल्याला म्हणून आयुष्यावर खूप philosophical बोलत सुटतो आपण....पण खर आयुष्य जवळून हे लोक पाहतात...अनुभवतात....
         यांच्या कडून जगण शिकल पाहिजे....आपण खरच सुखी आहोत हे  स्वतःला पटल पाहिजे.....स्वप्न नागरित  स्वतःच्या  स्वप्नात हरवताना....लाइफ track ला समान्तर चालणार्या या वास्तवाच  भान कायम राहिल पाहिजे....फ़क्त भानच नाही  राहिल पाहिजे तर त्यातून काहीतरी घडल पाहिजे.....सकारात्मक.....निदान स्वतःपुरता तरी.....2 comments:

  1. स्नेहल, मनाला पटतंय; पण मेंदूला नाही. तुला एक सांगू स्वच्छता राखायला पैसे नाही लागत. मी असं नाही म्हणत की फक्त झोपडपट्टीत राहणारेच घाणेरडे असतात. आपल्याकडचे अगदी गाडीत मिरवणारे ही काहीजण तितकेच घाणेरडे असतात. गाडीची काच खाली करून लाल पिंक सोडणारे, सूट-बूट घालून रस्त्यावर कचरा करणारे. माझी बायको आणि आई ही ह्याला अपवाद नव्हते. यावर उपाय म्हणजे जो जो असं काही करताना दिसेल त्याला बोलायचे; पण प्रत्येकवेळी ते शक्य नसतं; मग निदान ओळखीच्या लोकांना तरी सांगायची हिम्मत करावी

    ReplyDelete
  2. पण बाकीच्या गोष्टी पटल्या हं. रागावू नकोस ग... मला आता वाटतंय मी जरा जास्तच आवेशात वरची कमेंट टाकली... काय करू ग... आपल्या लोकांचा घाणेरडेपणा डोक्यात जातो...

    ReplyDelete