आकाशीच्या तारयानो
अंगणी माझ्या सांडून जा ना
जाता जाता आयुष्यावर
चांदणं पांघरून जा ना...
कले- कलेनेच वाढत जातो चंद्र
कले- कलेनेच दिसेनासा होतो...
...अमावसेच्या अंधाराला
पौर्णिमेचा प्रकाश द्या ना...
शांत- गहिऱ्या काळोखाचा
काळाशार आहे रंग...
... रंग छटेच्या गर्ततेचा
चंदेरी काठ व्हा ना...
संथ- वाहत्या प्रवाहाचे
खोल-खोल अंतरंग...
...अंतरंगी स्पर्शून त्याच्या
पारदर्शी करून जा ना...
आकाशीच्या तारयानो
अंगणी माझ्या सांडून जा ना...
वर्षभरा पूर्वी रात्री १२:५८ ला लिहून किंवा सुचून पूर्ण झालेली कविता...
ReplyDelete